
ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत असून सुविधा मात्र अत्यंत अपुऱ्या आहेत. त्यामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागतो. पर्यायी स्वच्छतागृहाची व्यवस्था, अपुरे सरकते जिने, वेटिंग रूम आदी समस्या निर्माण झाल्याने ठाणे स्थानक गैरसोयींचे आगार बनले आहे. या समस्या तातडीने सोडवण्यासाठी रेल कामगार सेनेने मुंबई मुख्यालयावर धडक देऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. प्रवाशांना तातडीने सुविधा पुरवा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख स्वप्नील शिरकर यांनी शिवसेना उपनेते, रेल कामगार सेनेचे जनरल सेक्रेटरी दिवाकर देव यांच्यासह मध्य रेल्वेचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापकांची भेट घेतली. ठाणे स्थानकातून रोज सहा ते आठ लाख प्रवासी ये-जा करतात. या स्थानकाचे ऐतिहासिक महत्त्व व काळाची गरज लक्षात घेऊन प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची गरज असल्याची बाब शिवसैनिकांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.
प्रमुख मागण्या
फलाट क्रमांक १ व २ वरील शौचालये एकाच वेळी बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे त्यामुळे नवीन शौचालयांचे काम तातडीने पूर्ण करून पर्यायी शौचालयांची व्यवस्था करावी. वेटिंग रूमच् अपुरी व्यवस्था असल्याने लांबपल्ल्याच्या गाड्यांच्य प्रवाशांना प्रतीक्षेदरम्यान अनेक अडचणींचा सामन करावा लागतो. दरम्यान प्लॅटफॉर्म ७ व ८ जवळ आधुनिक वेटिंग रूम उपलब्ध करावे.
दिव्यांगांची फरफट
फलाट क्रमांक ७ व ८ वर सरकते जिने लिफ्टची सुविधा उपलब्ध नाही. यामुळे ज्येष्ठ नागरिक महिला तसेच दिव्यांग यांची फरफट होत आहे. य सर्व समस्यांकडे संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले तसेच विविध मागण्यांचे निवेदनही दिले. यावेळ उपशाखाप्रमुख विजय कंगोरे, विभाग युवाधिकार रोहित विधाते, रेल कामगार सेनेचे पदाधिकारी वाय बी. जाधव, भरत शर्मा, स्वप्नील झेमसे, राजा कट्टी देवेंद्र कदम आदी उपस्थित होते.



























































