
हिंदुस्थानचा विश्वविजेता कर्णधार आणि शैलीदार फलंदाज रोहित शर्माच्या वन डे निवृत्तीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स येथे होणारा तिसरा वनडे सामना ही रोहितची हिंदुस्थानकडून अखेरची लढत असेल, अशी माहिती समोर आली आहे. गौतम गंभीर आणि संघ व्यवस्थापकांनी रोहितला आगामी वन डे विश्वचषकाच्या प्रकियेचा भाग नसल्याचे सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता रोहित तिसऱया वन डे सामन्यानंतर निवृत्ती जाहीर करेल, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.





























































