
आज धावपळीच्या जीवनात माणुसकी हरवते आहे. पण असेही काही जण असतात जे निःस्वार्थीपणे इतरांना आनंद देतात. बंगळुरू येथील ईशा योग केंद्रातील एक व्हिडीओत एक कॅमेरामॅन एका कुटुंबासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. पण ते जोडपे मूकबधिर असते. त्यांची मुलगी आपल्या आई-वडिलांची माहिती कॅमेरामॅनला सांगते. कॅमेरामन या कुटुंबाचा साधेपणा, त्या दाम्पत्याचा हसरा चेहरा पाहून खूपच प्रभावित होतो आणि त्यांना काही फोटो भेट म्हणून देण्याचे ठरवतो. तो त्यांचे काही फोटो काढतो. हा क्षण संस्मरणीय करण्यासाठी त्यांच्यासोबत स्वतःचाही फोटो काढतो. हा व्हिडीओ @hellosidhu_kannada या इन्स्टा अकाउंटवर शेअर केलाय. हा व्हिडीओ 2.65 कोटींपेक्षा जास्त वेळा बघण्यात आलाय. एका नेटीझनने लिहिलंय, ‘खरी माणुसकी तीच असते, जेव्हा कोणत्याही अपेक्षेशिवाय कुणाच्या आनंदाचं आपण कारण बनतो.’



























































