
सिबिल स्कोअर ७३० पेक्षा कमी असल्यास बँका कर्ज नाकारतात. सिबिल हा तुमच्या कर्ज परतफेडीचा इतिहास दर्शवणारा ३ आकडी क्रमांक असतो.
सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी कर्जाचे हप्ते आणि क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरणे, क्रेडिट युटिलायझेशन ३० टक्क्यांच्या खाली ठेवणे आणि नवीन कर्जासाठी वारंवार अर्ज करणे टाळावे.
सिबिलच्या अधिकृत वेबसाईटवर वर्षातून एकदा आपला स्कोअर तपासा. हा स्कोअर विनामूल्य पाहता येतो. वेबसाईटला पुन्हा भेट दिल्यास शुल्क आकारले जाऊ शकते.
तुमच्या एकूण क्रेडिट मर्यादेच्या फक्त ३० टक्के रकमेचा वापर करा. मर्यादा पूर्ण वापरल्याने तुम्ही कर्जावर जास्त अवलंबून आहात असा संदेश जातो.
कमी कालावधीत अनेक नवीन क्रेडिट कार्ड्स किंवा कर्जांसाठी अर्ज करू नका. यामुळे बँका वारंवार तुमच्या सिबिल रिपोर्टची तपासणी करतात, ज्यामुळे स्कोअर कमी होतो.





























































