
केंद्र सरकार आणि एलआयसी मिळून आयडीबीआय बँकेतील ६०.७ टक्के भागीदारी विकण्याच्या तयारीत आहे. या धोरणात्मक निर्गुंतवणुकीसाठी कॅनडाच्या फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्स आणि दुबईच्या एमिरेट्स एनबीडीने बोली लावली आहे. हा संपूर्ण व्यवहार पुढील एका महिन्यात अंतिम होण्याची शक्यता आहे. सध्या कंपन्यांच्या सुधारित बोलींची तपासणी केली जात आहे. हा प्रस्तावित व्यवहार केंद्र सरकारच्या स्ट्रॅटेजिक डिसइन्व्हेस्टमेंट कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
































































