पुरी रथयात्रेसाठी रिलायन्स फाऊंडेशनचे सेवा केंद्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुरी येथील जगप्रसिद्ध वार्षिक रथयात्रेसाठी रिलायन्स फाऊंडेशन ‘वी केअर’ने स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने सेवाभावी उपक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमात रिलायन्सतर्फे मुख्य यात्रा मार्गांवर 90 पोलीस मदत केंद्रांची उभारणी केली आहे. जवळपास एक हजार पोलीस कर्मचाऱ्यांना आवश्यक अल्पोपाहार व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर भाविक आणि पोलिसांना जेवण व शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी ‘अन्न सेवा’ केंद्र सुरू केले आहे. 15 ते 27 जुलैदरम्यान मध्यवर्ती स्वयंपाकघराच्या माध्यमातून ही ‘अन्न सेवा’ सुरू राहणार आहे. तसेच गर्दी व्यवस्थापनासाठी स्वयंसेवक तैनात असून पालिकेच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. या सर्व सेवांचे नियंत्रण जीआयएस तंत्रज्ञानाद्वारे केले जात आहे.