
सर्वात जास्त ऑक्सिजन आणि सावली देणारे झाड प्रत्येक गावात असावे या उद्देशाने तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी तालुक्यातील २२८ गावांत वडोरोपण करण्याचा निर्धार केला आहे. ‘गाव तिथे वडाचे झाड’ या मोहिमेंतर्गत शहापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वडाचे झाड लावून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
‘छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान’ अंतर्गत संपूर्ण तालुक्यात २२, २३ व २४ जुलै रोजी ३० ते ४० हजार झाडे लावण्याचा संकल्प असून घरटी दोन झाडे लावण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी जाहीर केले. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि शुद्ध प्राणवायूचा (ऑक्सिजन) पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी वृक्षारोपण ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरासमोर झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन तहसीलदारांनी केले आहे.
































































