असं झालं तर… आरोग्य विम्याचा क्लेम नाकारला?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1 आरोग्य विम्यात क्लेम नाकारणे, कॅशलेस उपचारात उशीर या अडचणी आल्यास विमा कंपनीच्या टीपीए किंवा हॉस्पिटलच्या इन्शुरन्स हेल्प डेस्कशी संपर्क साधावा.

2 समस्या निवारण न झाल्यास बिमा लोकपालाकडे तक्रार दाखल करणे हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, आजाराचे निदान, लॅब रिपोर्ट्स आणि सर्व पावत्या सांभाळून ठेवा.

3 जर हॉस्पिटल किंवा टीपीएने कॅशलेस क्लेम नाकारला किंवा उशीर केला तर विम्याच्या अधिकृत Grievance Redressal Officer (GRO) ला ई-मेलद्वारे तक्रार पाठवू शकता.

4 प्रत्येक कंपनीला साधारणपणे 15 दिवसांत तक्रारीचे निवारण करणे बंधनकारक असते. तसे न झाल्यास भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडे तक्रार नोंदवता येते.

5 जर क्लेमची माहिती देताना ती अपूर्ण किंवा चुकीची दिली गेली तर दावा दाखल करणे थांबू शकते. अर्ज पूर्ण आणि वेळेवर दाखल करणे अत्यावश्यक आहे.