आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घेतली लस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाविरुद्धच्या लढय़ात आघाडीवर असणारे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी जे जे रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली.

राज्यातील 45 वर्षांवरील सर्व नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले. कोरोनाला हरविण्यासाठी लसीकरण आवश्यक असून आतापर्यंत सुमारे 1 कोटी 22 लाख लाभार्थ्यांना लस देऊन महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे असे राजेश टोपे यांनी आवर्जून सांगितले.