राजू शेट्टी यांचा अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभेत भाजप सरकार विरोधातील अविश्वास दर्शक ठरावावर चर्चा सुरू आहे. यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी माझा अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने मी अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देतो, असे राजू शेट्टी संसदेमध्ये म्हणाले.