आदिवासींच्या प्रश्नावर आवाज उठवतो म्हणून फडणवीसांनी माझे तिकीट कापले, राजू तोडसाम यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आदिवासींच्या प्रश्नावर वारंवार आवाज उठवत असल्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनी 2019 च्या निवडणुकीत माझे तिकीट कापले, असा आरोप भाजपचे माजी आमदार राजू तोडसाम यांनी केला आहे. राजू तोडसाम यांनी आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. जयंत पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. आदिवासी समाजाचा एक प्रामाणिक, होतकरू नेता राष्ट्रवादीत प्रवेश करत आहे. भाजपमध्ये जुन्या नेत्यांना डावलले जात आहे. त्यातूनच तोडसाम यांच्यासारखा नेता आज आपल्या पक्षात प्रवेश करत आहे, असेही जयंत पाटील म्हणाले. यावेळी तोडसाम यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मी भाजपमध्ये 10 वर्षे काम केले. सर्वांना सोबत घेऊन चालत राहिलो. मला 2014 साली आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. भाजप सोडत असताना माझ्या मागे ईडी लागेल याची मला चिंता नाही. मी आदिवासी माणूस असून माझ्याकडे काहीच नाही. चौकशी केली तरी काही सापडणार नाही’, असे तोडसाम म्हणाले.