
रकुल प्रित सिंह हिचा इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्रींमध्ये समावेश होतो. रकुल हित्या चाहत्यांची मोठी यादी आहे. त्यामुळे साऊथ ते बॉलिवूड असा प्रवास तिला करता आला.

‘यारियां’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतुकही झाले होते.

चित्रपटसृष्टीसह सोशल मीडियावरही रकुल प्रित सिंह सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर ती आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.

नुकतेच तिने आपल्या अकाऊंटवरून काही खास फोटो शेअर केले आहेत. यात तिने ब्ल्यू कलरचे शॉर्टस घातले असून यात ती खूपच सुंदर दिसतेय.

‘मूड’ असे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे. हे फोटो चाहत्यांना आवडले असून यावर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडला आहे.

कामाबाबत बोलायचे झाल्यास रकुल प्रित सिंह नुकतीच अजय देवगन याच्यासोबत ‘रनवे-34’ चित्रपटामध्ये दिसली होती.



























































