रिपाईला हव्या केरळमधील लोकसभेच्या जागा, भाजपला दिला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्रीय कॅबिनेट मंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केरळमधील लोकसभेच्या एक ते दोन जागा त्यांना देण्यात याव्या अशी मागणी भाजपकडे केली आहे. तसेच जर भाजपने केरळमध्ये जागा दिल्या नाहीत तर आरपीआय स्वबळावर निवडणूक लढवेल असा इशारा देखील त्यांनी यावेळी भाजपला दिला आहे.

‘मी भाजपचे केरळमधील अध्यक्ष श्रीधरण यांच्याकडे लोकसभेच्या 20 जागांपैकी एक किंवा दोन जागा रिपाईला द्या अशी मागणी केली आहे. जर त्यांनी आम्हाला एक दोन जागांवर उमेदवारी दिली तर आम्ही त्यांच्यासोबत युती करू. जर आम्हाला जागा मिळाल्या नाहीत तर आम्ही चार ते पाच जागांवर स्वतंत्रपणे लढू आणि इतर जागांवर भाजपला पाठिंबा देऊ’, असे आठवले यांनी सांगितले.