परळी नगर परिषदेला दिवाळीचा विसर; राणी लक्ष्मीबाई टॉवर यंदा रोषणाई विनाच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळी उत्सवात आपण दिव्यांची आरास मांडून अवघा परिसर प्रकाशमय करून टाकतो. दिवाळीनिमित्त शहरातील खाजगी तसेच सरकारी मालमत्तेवर विशेषतः प्राचीन परंपरा असलेल्या ठिकाणांवर आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. असे असताना शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राणी लक्ष्मीबाई टॉवरला विद्युत रोषणाई करण्याचा विसर यंदा नगर परिषदेला पडलेला दिसून आला.

प्रतिवर्षी दिवाळीनिमित्त राणी लक्ष्मीबाई टॉवरला आकर्षक रोषणाई केली जाते मात्र या वर्षी दिवाळीचा कोणताही अंदाज न.प. प्रशासनला आलेला दिसून येत नाही.म्हणून न.प. प्रशासनाने कोणत्याही प्रकारची रोषणाई केलेली दिसली नाही.तसेच नगर परिषदेच्या नगर परिषदेने महत्वाचे ठिकाण असलेल्या टॉवरला दिवाळीनिमित्त विद्युतरोषणाई न केल्याने नागरिकात चांगलीच चर्चा रंगली आहे.दरम्यान या विद्युतरोषणाई बाबत परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता ते नॉटरिचेबल असल्याने त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.