राणी सावगावच्या बसस्थानकात गैरसोय, रस्त्यात चिखलाचं साम्राज्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, राणी सावरगाव

गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव या ठिकाणी रेणुका देवीची जागृत व प्राचीन मूर्ती असून सर्वदूरवरून दर्शनासाठी भाविक गर्दी करत असतात. या शिवाय मोठी बाजारपेठ असून सद्यस्थितीत गावाने विस्तृत स्वरुप घेतले आहे. साडेतीन शक्तीपिठापैकी एक असलेल्या या या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी बसस्थानक म्हणजे फक्त लिंबाचया झाडाखालीलल एक ओटा असून येथे मोठी गैरसोय होताना दिसत आहे. पावसाळ्यात प्रचंड चिखल आणि परिसरात मोठे तळे साचते. याचा मोठा त्रास बाहेरगावाहून येणाऱ्या भाविक भक्तांना करावा लागतो.

गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव हे गाव तीन शक्तिपीठांपैकी एक आहे. मोठा आठवडी बाजारही भरतो. त्याचे शहरात रूपांतरित झाले आहे. या ठिकाणी परभणी, लातूर, बीड सीमेवर डोंगराळ भागात हे गाव येते. सर्वदुरहून सतत प्रवाशांची ये-जा चालूच असते. परंतु येथील बसस्थानक केवळ नावालाच उरले आहे. ग्रामपंचायतच्या तुटपुंज्या जागेतील एकलिंबाचे झाड व त्या झाडाभवती 10 बाय 10 च्या गोल आकाराचा ओटा आहे. या ओट्याला फेरीमारून एसटी बस पुढच्या गावाला रवाना होते. ऊन, पाऊस व बसण्यासाठी या ओट्याचा अनेक वर्षापासून प्रवाशी आधार घेत आहेत. यावर कुठल्याप्रकाराचे आच्छादन नसल्याने पावसाळ्यात येथे बसणे तर सोडाच उभा टाकणे देखील मुश्किल होते. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. या बसस्थानकात ग्रामपंचायतीकडून जागा मिळून त्या जागा काही व्यापाऱ्यांनी इतरांना भाड्याने दिल्या आहेत. यामुळे ग्रामपंचायतकडून जागा मिळवण्यासाठी मोठी चढाओढ होत असल्याने बसस्थानकात एसटी बसला ये-जा करण्यास मोठे अडथळे निर्माण झाले आहेत.

याच प्रमाणे हात गाडेवाले मोकाट शेळ्या, डुकरे, कुत्रे येथे मुक्त संचार करतात. याच प्रमाणे आजूबाजूचा परिसर अस्वच्छ आहे. या व इतर गैरसोयीने प्रवाशांचे बेहाल होत आहेत. स्थानिक ग्रामपंचायतचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येते. जर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तसद घेऊन बसस्थानकासाठी नूतन जागा उपलब्ध करून त्याजागेवर सुशोभित बसस्थानक उभारण्यात आले, तरच प्रवाशांच्या गैरसोय दूर होतील, आसा अपेक्षा प्रवाशीवर्गासह भाविकभक्तांतून व्यक्त होत आहे. निवडणूका आल्या की मोठमोठी भाषण पोकळ आश्वासने देऊन नेतेगिरी करणारे निवडून जिंकल्यानंतर मात्र बसस्थानकाच्या मुद्द्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. राणी सावरगावचे बसस्थानक हे नावालाच उरले आहे. त्यात प्रवाशांचा श्वास गुदमरतो याला जबाबदार कोण? अशा प्रतिक्रीया जनमासातून उमटत आहेत.