
कोरोना महामारीमुळे देशांतर्गत सर्वात महत्त्वाच्या असलेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या आयोजनाबाबत बीसीसीआय अद्याप संभ्रमात आहे. मात्र रणजी करंडक स्पर्धा ही हिंदुस्थानी क्रिकेटचा कणा आहे. जेव्हा रणजी क्रिकेटकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात होईल तेव्हा हिंदुस्थानी क्रिकेटचा कणाच दुबळा होऊन मोडला जाईल, असे परखड मत व्यक्त करीत हिंदुस्थानचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्र्ााr यांनी बीसीसीआयवर निशाणा साधला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनावर मर्यादा आल्या होत्या. कोरोनामुळे 2020-21 ची रणजी स्पर्धा रद्द करण्यात आली होती. मात्र कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोनमुळे पुन्हा परिस्थिती बिघडल्याने रणजी करंडक स्पर्धेच्या आयोजनावरच अनिश्चितेचे सावट आहे.


























































