
भजी आणण्यासाठी गिरगावातल्या अरब गल्ली येथे गेली असता एका तरुणीवर बलात्कार करून एक तरुण सटकला होता. 12 जुलै रोजी रात्री 8.30 वाजता गिरगावात राहणारी तरुणी अरब गल्ली येथे मोमोज आणि भजी आणण्यासाठी गेली होती. त्या वेळी एका तरुणाने तिला थांबवून बोलायचे असल्याचे सांगत एका बाजूला येण्यास सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवत ती त्याच्यासोबत एका बाजूला गेली असता परिसरात काळोख व कोणी नसल्याचे हेरून त्याने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यावर तिने नकार दिला असता तरुणाने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तो तेथून पळून गेला. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच डी.बी. मार्ग पोलिसांनी खेतवाडी-10व्या गल्लीत सापळा रचून आरोपीला बुधवारी पकडले.



























































