लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणाचा नर्सवर बलात्कार

3475

गडचिरोलीत एका नराधमाने नर्सवर बलात्कार करून तिला मारण्याचा प्रयत्न केला आहे. राजेश कांबळी असे आरोपीचे नाव असून त्याला अटक केली आहे. रविवारी सायंकाळी ८ वाजता तरुणी हॉस्पिटलमध्ये आपले काम संपवून घरी जात होती. बस स्टॉपवर तरुणी बसची वाट पाहत होती. परंतु खूप उशीर झाला होता. तेव्हा राजेश कांबळी तिथून जात होत. राजेश कांबळी आणि तरुणीची ओळख होती. दोघे एकाच गावाचे रहिवासी असल्याने तिला राजेशने घरी सोडण्याची तयारी दाखवली.तरुणीने विनंती मान्य करत राजेशसोबत जायचं ठरवलं. परंतु नंतर पुढे एका शेतात तिला नेऊन राजेशने तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिला जिवे मारण्याचा प्रयत्नही केला. या हल्ल्यात तरुणीची बेशुद्धी पडली. राजेशला वाटले तरुणीचा मृत्यू झाला. तरुणी मृत्यूमुखी पडली असं वाटल्याने राजेशने तिच्याकडचा मोबाईल आणि किमती ऐवज घेऊन पोबारा केला.

नंतर काही वेळाने पीडित तरुणीला शुद्ध आली. जवळच्या मिलमधल्या कामगारांची तिने मदत घेत घर गाठले आणि कुटुंबीयांना सर्व हकीगत सांगितली. कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करून सोमवारी आरोपी राजेश कांबळीला अटक केली. आरोपीची बायको गरोदर असल्याचे समोर आले आहे. पीडित तरुणीला जवळच्या इस्पितळात दाखल केले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

तिरुपतीमध्येही सारखी घटना

आंध्रप्रदेशमध्येही गडचिरोलीसारखी घटना घडली आहे. तिरुपतीमध्ये एका अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी बलात्कार केला आहे. मुलीला घरी जाण्यास उशीर होत होता म्हणून तिने चित्तुट व्यंकटेश या बाईकस्वार तरुणाला घरी सोडण्याची विनंती केली. त्यानेही विनंती मान्य करत तिला लिफ्ट दिली. मध्येच बाईकमधील पेट्रोल संपल्याचा बहाणा व्यकंटेशने केला. आणि आपल्या मित्राला त्याने बोलवून घेतले. तेव्हा त्याने आणि त्याच्या मित्राने मुलीवर बलात्कार केला. मुलगी जेव्हा घरी पोहोचली तेव्हा तिने कुटुंबीयांना सर्व काही सांगितले. कुटुबींयांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसंनी तत्काळ कारवाई करत दोघांना अटक केली.

आपली प्रतिक्रिया द्या