
फ्रान्सचा डिफेंडर राफाएल वॉरेनने आपल्या दहा वर्षांच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉल करिअरला थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. 2018 साली फिफा वर्ल्ड कप जगज्जेत्या संघाचे त्याने प्रतिनिधित्व केले होते. 29 वर्षीय वॉरेन 2013 साली फ्रान्स संघाकडून खेळण्यास सुरुवात केली. त्याने आतापर्यंत फ्रान्सकडून 93 सामने खेळले आहेत. आपल्या सुंदर देशाकडून खेळण्याचे जे भाग्य लाभले, त्याला मी माझा सर्वोच्च सन्मान मानतो. मी जेव्हा जेव्हा निळ्या जर्सीत वावरलोय, तो माझ्यासाठी अभिमानाचा क्षण होता. मी गेले काही महिने या निर्णयाबाबत विचार करत होतो, अखेर तो निर्णय घेण्याची योग्य वेळ आता आलीय, अशी भावना वॉरेनने निवृत्ती वेळी व्यक्त केली.


























































