भ्रष्टाचाराचा ‘आदर्श’, भाजपवासी होताच अशोक चव्हाणांना राज्यसभेचे तिकीट

ईडी, सीबीआय यासारख्या पेंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखवून पह्डापह्डीचे राजकारण करणाऱया भाजपने कॉँग्रेसचा हात सोडून पक्ष प्रवेश करणाऱया अशोक चव्हाण यांना काही तासांतच राज्यसभेचे तिकीट देत भ्रष्टाचाराचा ‘आदर्श’ घालून दिला आहे. त्यापाठोपाठ मिंधे गटाकडून मिलिंद देवरा यांनाही राज्यसभेची लॉटरी लागली आहे. अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतविण्यात आले आहे. पेंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पत्ता कट करून पुण्याच्या मेधा कुलकर्णी आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछडे यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तर कॉँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातून राज्यसभेत पाठविण्यात येणाऱया सहा जागा एप्रिल महिन्यात रिक्त होत आहेत. यासाठी 27 फेब्रुवारीला होत असलेल्या निवडणुकीत विधिमंडळातील पक्षीय बलाबल पाहता भाजपचे तीन, मिंधे गट, अजित पवार गट आणि कॉँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेवर निवडून येणार आहे. या सहा जागांसाठीच्या उमेदवारांची घोषणा आज करण्यात आली. यात भाजपकडून चर्चेत असलेल्या नावांना बगल देत नव्या व अनपेक्षित चेहऱयांना उमेदवारी देत राज्यसभा निवडणुकीत धक्कातंत्राचा अवलंब केला आहे.

– कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात ज्या आदर्श घोटाळ्यावरून भाजपने रान उठवले होते. त्या आदर्श घोटाळा प्रकरणात कारवाईची टांगती तलवार असल्याने घाबरून कॉंग्रेसचा हात झटकत कमळाबाईच्या पदराआड गेलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना काही तासांतच भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. कोणत्याही पदाच्या लालसेने पक्ष प्रवेश केला नसल्याचा दावा चव्हाण यांनी केला होता. मात्र आदर्श प्रकरणात चौकशीचा ससेमिरा मागे लागू नये आणि उमेदवारीसाठीच ते भाजपमध्ये गेल्याचे सिद्ध झाले आहे.

– 2019च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांना भाजपने कोथरूडमधून उतरवल्याने मेधा कुलकर्णी यांना त्यांचा हक्काचा मतदारसंघ सोडावा लागला होता. चंद्रकांत पाटील यांच्यामुळे राजकीय विजनवासात गेलेल्या कुलकर्णी यांना राज्यसभेची संधी देऊन पक्षाने त्यांचे पुनर्वसन करण्याबरोबरच ब्राह्मण समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

नारायण राणे, पियूष गोयल यांना मागचे दार बंद
पेंद्रीय मंत्री नारायण राणे यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारण्यात आली आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या पियूष गोयल यांनाही तुमच्यासाठी मागचे दार बंद झाल्याचे संकेत दिले आहेत. राणे यांना कोकणातून तर गोयल यांना मुंबईतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा विचार भाजप पक्षश्रेष्ठाRकडून केला जात आहे.

निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता
राज्यसभा निवडणूक ही बिनविरोध होणार असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. भाजप या निवडणुकीत अतिरिक्त उमेदवार देणार नसल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

तावडे, पंकजा यांनाही धक्का
भाजपकडून राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे व सचिव पंकजा मुंडे यांची नावे चर्चेत होती. प्रदेश भाजपकडून त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. पण तावडे व पंकजा मुंडे यांची राज्यसभेची दावेदारी मोडीत काढत पक्षाने त्यांना मोठा धक्का दिला आहे. अनेक वर्षे संघ व भाजपचे काम करणाऱया डॉ. अजित गोपछडे यांना त्यांच्या निष्ठsचे फळ मिळाले आहे. माधव भंडारी नेहमीप्रमाणे या वेळीही कमनशिबी ठरले, तर कॉँग्रेसमधून आलेले हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या चित्रा वाघ या नावांचा साधा विचारसुद्धा भाजपच्या पेंद्रातील नेतृत्वाने केला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेवर
काँग्रेस हायकमांड, पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पक्षाने राजस्थानमधून राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक सोनिया गांधी रायबरेलीमधून लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने बिहारमधून अखिलेश प्रतापसिंग व हिमाचल प्रदेशमधून अभिषेक मनू सिंघवी यांना आज उमेदवारी जाहीर केली.

कॉँग्रेसकडून हंडोरे यांना निष्ठेचे फळ
ज्या कॉँग्रेस पक्षाने इतकी वर्षे राजकारणात पद आणि प्रतिष्ठा मिळवून दिली त्याच पक्षाची साथ सोडून अनेक दिग्गज नेते दुसऱया पक्षांत जात आहेत. अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, बाबा सिद्दिकी यासारखे नेते राजकीय स्वार्थासाठी कॉँग्रेसमधून बाहेर पडले. अशा परिस्थितीत पक्षासोबत राहणाऱया चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन कॉँग्रेसने निष्ठsचे फळ दिले आहे. हंडोरे यांना मागील विधान परिषद निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता.