
गेले चार दिवस एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरु आहे. जिल्ह्यातील 27 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये रत्नागिरीमधील 18 आणि राजापूर तालुक्यातील 9 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सोमवारपासून एसटी कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने जिल्ह्यातील एसटी वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. एसटी बंदमुळे सर्वसामान्य नागरीकांची गैरसोय झाली आहे. ग्रामीण भागातील नागरीकांना शहरात येणे अशक्य आले आहे. गेले चार दिवस हा बेमुदत संप सुरु असून एसटीच्या काही कर्मचाऱ्यांनी एसटी आगाराबाहेर ठाण मांडले आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने खासगी बस, स्कूल बस यांना प्रवासी वाहतूकीची परवानगी दिली आहे.


























































