
ग्रामपंचायत निवडणूकीत उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 479 ग्रामपंचायतींपैकी 119 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत़. 951 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे 360 ग्रामपंचायतींत 4338 उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत़. 15 जानेवारीला मतदान होणार आहे़.
मंडणगड तालुक्यात 49 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत़. 2 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून 13 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूका होणार आहेत़. दापोली तालुक्यात 251 उमेदवार बिनविरोध निवडून आले असून 15 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत़. दापोलीमध्ये 42 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे़.
खेड तालुक्यात 330 उमेदवार बिनविरोध झाले असून 23 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत़. त्यामुळे खेडमध्ये 64 ग्रामपंचायतीत निवडणूक रंगणार आहे़. गुहागर तालुक्यात 13 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून 154 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत़. गुहागरात 16 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे़. संगमेश्वर तालुक्यामध्ये 19 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून 298 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत़. संगमेश्वरात 62 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक रंगणार आहे़. रत्नागिरी तालुक्यात 181 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत़. 12 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यामुळे 41 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक रंगणार आहे़.
लांजा तालुक्यात 4 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून 72 उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत़. त्यामुळे लांजात 19 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे़. राजापूर तालुक्यात 136 उमेदवार बिनविरोध झाले आहेत़. 9 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यामुळे राजापूरात 42 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक रंगणार आहे.






























































