
अमेरिकेच्या हिंडेनबर्ग रिसर्च पंपनीच्या अहवालामुळे प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या साम्राज्याला रोज हादरे बसत आहेत. आता या प्रकरणात रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) उडी घेतली असून, अदानी उद्योग समुहातील पंपन्यांना कर्ज देणाऱ्या आणि गुंतवणूक करणाऱ्या बँकांची चौकशी करण्यात येणार आहे. बँकांकडून याबाबत आरबीआयने माहिती मागविली आहे. दरम्यान, गुरुवारी मुंबई शेअर बाजारात अदानी समूहातील पंपन्यांचे समभाग मोठय़ा प्रमाणावर कोसळले.
बुधवारी अदानी समूहाने 20 हजार कोटींचा एफपीओ रद्द करून गुंतवणूकदारांना पैसे परत देण्याचे जाहीर केले. परंतु गुरुवारी मुंबई शेअर बाजारात समभागांची घसरण सुरूच राहिली.
एसबीआय, एलआयसीची चौकशी होणार?
अदानी समूहातील पंपन्यांना बँकांनी सुमारे 80 हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. कर्ज देणाऱ्या बँकांमध्ये प्रमुख सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियासह (एसबीआय) इतर महत्वाच्या खासगी बँका आहेत. या कर्जाबाबत माहिती घेऊन रिझर्व्ह बँक चौकशी करणार आहे.
सरकारी विमा पंपनी एलआयसीची मोठी गुंतवणूक आहे. अदानी एंटरप्रायजेसमध्ये 4.23 टक्के हिस्सा एलआयसीचा आहे. अदानी पोर्टस्मध्ये 9.14 टक्के, अदानी ट्रान्समिशनमध्ये 3.35 टक्के, अदानी टोटल गॅसमध्ये 5.96 टक्के गुंतवणूक आहे.
हिंडेनबर्ग रिसर्च पंपनीचा अहवाल येण्यापूर्वी 24 जानेवारी रोजी अदानी समूहात एलआयसीची गुंतवणूक 81 हजार 268 कोटी रुपयांची होती. अहवाल जाहीर होताच शेअर घसरले आणि एलआयसीची गुंतवणूक 62 हजार 621 कोटी रुपयांपर्यंत घसरली.
समभागांची मोठय़ा प्रमाणावर घसरण सुरूच
मुंबई शेअर बाजारात गुरुवारी अदानी एंटरप्रायझेसचे समभाग 26.50 टक्क्यांनी घसरले. अदानी ट्रान्समिशन 10 टक्के, अदानी ग्रीन एनर्जी 10 टक्के, अदानी टोटल गॅस 10 टक्के आणि अदानी पोर्टचे समभाग 6.13 टक्क्यांनी घसरले. हिंडनबर्गचा अहवाल 24 जानेवारीला जाहीर झाला. तेव्हापासून अदानी समूहाच्या समभागांची घसरण थांबलेली नाही.






















































