निष्क्रिय बँक खाती पुन्हा सुरू करणे झाले सोपे

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) देशभरातील बँकांमधील बंद किंवा निष्क्रिय खाती आणि दावा न केलेल्या ठेवींबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

आरबीआयने निक्रिय बँक खाती पुन्हा उघडण्याची प्रक्रिया शिथिल केली आहे. त्यानुसार आता निष्क्रिय खाती पुन्हा सुरू करण्यासाठी फक्त ग्राहकाला केवायसी तपशील द्यावा लागेल. बँकेच्या कोणत्याही शाखेत जाऊन केवायसी प्रक्रिया करता येईल. खातेदाराच्या विनंतीनुसार व्हिडीओ कस्टमर आयडेंटीफिकेशन प्रोसेसदेखील पूर्ण केली जाऊ शकते. याशिवाय निक्रिय खात्यातून कुणी पैसे काढू नये, यासाठी नियम काहीसे कडक करण्यात आले आहेत, वर्षानुवर्षे निक्रिय असलेली खाती पुन्हा सक्रिय करण्यासाठी बँका कोणतेही शुल्क आकारू शकत नाहीत. तसेच निक्रिय खात्यात किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल दंड आकारू शकत नाहीत. बँकांना बचत खाते निष्क्रिय असले तरीही त्यावर व्याज देणे सुरू ठेवावे लागेल.

आरबीआयची सुधारित मार्गदर्शक तत्त्वे 1 एप्रिलपासून लागू होतील.