VIDEO मिंधेच्या खासदाराची स्टंटबाजी, डिनला शौचालय साफ करायला लावले; व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेडमधील सरकारी रुग्णालयात गेल्या 48 तासात 31 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात गेल्या 24 तासात 14 रुग्णांटा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही घटनांनी राज्यात खळबळ उडवली असून यातून मिंधे सरकारच्या राजवटीत आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे समोर आले आहे. असे असतानाच मिंधे गटातील  गद्दार खासदार हेमंत पाटील यांच्या चमकोगिरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

नांदेड रुग्णालयाचे वृत्त समोर येताच हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे रुग्णालयात दाखल झाले. गेल्या अनेक महिन्यात रुग्णालयात फिरकले देखील नसलेल्या खासदार महाशयांनी थेट रुग्णालयाचे अधिष्ठाता एस. आर. वाकोडीकर यांना स्वच्छतागृहाची साफसफाई करायला लावली. त्यांच्या या चमकोगिरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.