खासदारांचे रोजचे पाच प्रश्न कमी केले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
parliament

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

संसद अधिवेशनात रोज १० प्रश्न विचारण्याची मुभा आजवर खासदारांना होती. पण त्यात कपात करण्यात आली असून आता रोज केवळ पाचच प्रश्न त्यांना विचारता येणार आहेत. लोकसभा अध्यक्षांच्या आदेशानुसार कोणत्याही खासदाराला लोकसभेत यापुढे एका दिवशी केवळ पाचच प्रश्नांची नोटीस देता येईल.

लोकसभा अध्यक्षांच्या आदेशानुसार दररोज २३०पेक्षा जादा प्रश्न नोटिसा देता येणार नाहीत. लोकसभा सरचिटणीस स्नेहलता श्रीवास्तव यांनी याबाबत बुलेटिन जारी केले आहे. जर एखाद्या सदस्याने दिवसाला पाचपेक्षा अधिक प्रश्नांची नोटीस दिली असेल तर इतर प्रश्न पुढील कामकाजाच्या दिवशी उपस्थित करता येऊ शकतील. लोकसभा अध्यक्षांचा हा नवा आदेश १६ व्या लोकसभेच्या १५ व्या सत्रापासून लागू होणार आहे.