केंद्र सरकारच्या भूखंडावरील झोपडय़ांचे पुनर्वसन करा, शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांची मागणी

पंतप्रधान आवास योजनेतून बेघरांना घर दिले जाईल असे केंद्र सरकारने अर्थसंकल्प मांडताना स्पष्ट केले आहे. मात्र आज केंद्राच्या अखत्यारितील मंत्रालयांचे अनेक भूखंड रिकामे असून काही ठिकाणी त्यावर झोपडय़ा आहेत. त्यांचे पुनर्वसन केंद्राने करावे, अशी मागणी शिवसेना नेते-खासदार गजानन कीर्तिकर यांनी आपल्या अर्थसंकल्पावरील भाषणात केली आहे.

अर्थसंकल्पावर बोलताना गजानन कीर्तिकर यांनी सुरुवातीलाच महाराष्ट्रातला अपुरा निधी दिल्याबाबत नाराजी व्यक्त केली. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला 67 हजार 328 कोटी रुपये देण्याची तरतूद केली होती, मात्र प्रत्यक्षात 48 हजार 526 कोटी निधी दिला. हा महाराष्ट्रावर अन्याय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याचबरोबर विविध मुद्दय़ांकडे सरकारचे लक्ष वेधले.

  • एअर इंडिया, एलआयसीसह केंद्राच्या अखत्यारीतील कंपन्यांचे खासगीकरण केले जात आहे. या आस्थापनांमध्ये सध्या कर्मचाऱयांना मिळणारे लाभ आणि भरतीच्या वेळी पेंद्राच्या नियमानुसार आरक्षणासह भरती करणे संबंधित खासगी कंपन्यांना बंधनकारक करावे.
  • प्रत्येक जिल्हा व तालुका रुग्णालयामध्ये सीटी स्पॅन, एमआरआय, डायलिसीस मशीन यांसारख्या अत्याधुनिक तपासणी मशीन्स बसवाव्यात.