रेखाचे छोट्या पडद्यावर पदार्पण

गेली अनेक दशके हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय, चिरतरुण सौंदर्य आणि घायाळ करणाऱ्या अदांमुळे रसिकांच्या मनात घर निर्माण करणाऱया सदाबहार अभिनेत्री रेखा आता छोटय़ा पडद्यावर पदार्पण करणार आहेत. ’स्टार प्लस’ वाहिनीवरील ’गुम है किसी के प्यार में’ या मालिकेत त्या झळकणार असल्याची चर्चा आहे. नुकताच ह्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेत्री रेखा ’गुम है किसी के प्यार में’ हे गाणे गुणगुणताना दिसतायत. ’हे गाणे माझ्या हृदयाच्या अत्यंत जवळ आहे. या गाण्यात एक गोष्ट लपलीयं. प्रेमाची वाट तर पाहतेय पण त्याचं नाव घेण्याची परवानगी नाहीये…जेव्हा मन पुणाच्या तरी प्रेमात हरवते तेव्हा ते प्रेम म्हणजे पूजा बनते.’ असे त्या म्हणाल्या. या गाण्यानेच विराटच्या प्रेमकथेचा जन्म दिला असून कर्तव्याच्या वाटेवर चालताना त्याला त्याच्या प्रेमाचा त्याग करावा लागतो, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या