मुंबई मेट्रो सरकार खरेदी करणार

अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स लिमिटेड इन्फ्रास्ट्रक्चर (रिइन्फ्रा) आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्या संयुक्त मालकीचा खासगी व सार्वजनिक भागीदारीचा प्रकल्प मुंबई मेट्रो लाइन-1 चा 11.4 किमी वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो मार्गाची खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न चालवले आहेत. रिइन्फ्राची मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) मध्ये 4 हजार कोटी रुपयांच्या मूल्यांसह 74 टक्के भागीदारी आहे. मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणारा हा एकमेव मार्ग आहे.