
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची धुरा प्रियांका गांधी-वाड्रा यांच्याकडे देण्यात आल्याची घोषणा आज (बुधवार) काँग्रस पक्षाकडून करण्यात आली. तसेच त्यांच्याकडे उत्तर प्रदेश (पूर्व)ची जबाबदारी देण्यात आली आहे. याची घोषणा होताच काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. थोडं थांबा लोकसभा निवडणुकीआधी आणखी सरप्राईज मिळाणार आहेत, असं मत काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी व्यक्त केलं आहे.
Renuka Choudhary, Congress on Priyanka Gandhi Vadra: It is a brilliant step by Rahul Ji, the BJP is rattled, it shouldn’t come as a surprise, this decision is something that has been speculated forever, and I think we should all wait for more surprises just before the elections. pic.twitter.com/TX84uOZzqD
— ANI (@ANI) January 23, 2019
खासदार रेणुका चौधरी यांनी राहुल गांधी यांच्या या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे. प्रियांका गांधी-वाड्रा यांना सरचिटणीस पद देऊन राहुल गांधी यांनी जबरदस्त पाऊल उचलेले आहे. भाजपाचा गोंधळ उडाला आहे, अर्थात हा आश्चर्यचकित होऊ नये, असा निर्णय आहे. याविषयी आधीपासूनच अंदाज बांधले जात होते. आपण सर्वांनी थोडं थांबलं पाहिजे, निवडणुकीआधी आणखी काही थोडं थांबा आणखी सरप्राईज मिळतील, असं रेणुका चौधरी म्हणाल्या.






















































