
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
रत्नागिरीतील कारवांचीवाडी येथे एका बंद घराचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश करत ६ लाख २१ हजाराचा माल लंपास केला आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरुण शामराव गुजर यांनी चोरीची फिर्याद दाखल केली आहे. कारवांचीवाडी येथील बंद घराचा कडी कोयंडा उचकटून चोरांनी घरात प्रवेश केला. बाथरुमच्यावर अडगळीत पिशवीत ठेवलेले ४ लाख ७१ हजार रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने आणि देवघरातील लाकडी कपाटात पिशवीत ठेवलेली दिड लाखाची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.

































































