रोहित शर्मा T20 साठी टीम इंडियाचा नवा कर्णधार? लवकरच घोषणेची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

न्यूझीलंड विरुद्ध आगामी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा पुढील काही दिवसांत होऊ शकते. चेतन शर्मा यांच्या नेतृत्त्वातील निवडी समितीसमोर सगळ्यात मोठे आव्हान T20 चा कर्णधार निवडीचे असणार आहे. कर्णधार विराट कोहलीने याधीच घोषणा केली होती की यूएईमधील T20 वर्ल्ड कप नंतर पद सोडणार आहे.

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार सध्याचा उपकर्णधार रोहित शर्मा T20 मधील कर्णधार पदाचा मुख्य दावेदार आहे. टीम इंडियाचे खेळाडू एप्रिलपासून सतत क्रिकेट खेळत असल्याने सिनीअर खेळाडूंना न्यूझीलंडविरुद्धच्या T20 मालिकेत आराम देण्याची शक्यता आहे.

कोहलीने केवळ T20 चे कर्णधार पद सोडलं आहे तेव्हा निवड समिती सफेद चेंडूच्या फॉर्मेटमध्ये केवळ एकच कर्णधार बनवण्यासंदर्भातही विचार होऊ शकतो. मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा आणि त्यांचे सहकारी अबे कुरुविला दुबईत आहे. तर बाकी निवड समिती सदस्य हिंदुस्थानात आहेत.

न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवडल्या जाणाऱ्या खेळाडूंना 10 नोव्हेंबरपर्यंत रिपोर्ट करण्यास सांगितले पाहिजे. या तयारीसाठी सर्वांना 5 दिवसांच्या क्वारंटीन मधून जावे लागणार आहे. राहुल द्रविड याच काळात प्रशिक्षक पदावर विराजमान होऊ शकतो.

न्यूझीलंडची टीम हिंदुस्थानच्या दौऱ्यावर T20 च्या तीन सामन्यांची मालिका आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पहिला T20 सामना 17 नोव्हेंबर रोजी जयपूर येथे होणार आहे. त्यानंतर 19 नोव्हेंबर रोजी रांची येथे तर 21 नोव्हेंबर रोजी, तर 21 नोव्हेंबर रोजी कोलकता येछे होणार आहे. पहिला कसोटी सामना 25 नोव्हेंबर रोजी कानपूर येथे तर 3 डिसेंबर रोजी मुंबईत खेळवला जाणार आहे.