शाळेच्या बसमधून विद्यार्थी पडला, आरटीओने केली १०० स्कूलबसविरूद्ध कारवाई

24

सामना ऑनलाईन, संभाजीनगर

तीन दिवसांपूर्वी गोवर रुबेला लस देण्यासाठी आलेल्या बस मधून पडून विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर जाग आलेल्या आरटीओने शुक्रवारी एकाच वेळी शहरातील सगळ्या स्कूलबसची तपासणी केली. या तपासणी मोहिमेत तब्बल 100 स्कूल बसवर कारवाई करण्यात आली आहे.

रांजणगाव शेणपुंजी येथील शाळेचे विद्यार्थी तीन दिवसांपूर्वी रुबेला लस देण्यासाठी शहरातील शिवाजी हायस्कूलमध्ये आले होते. लसीकरण मोहीम आटोपल्यानंतर ते परत रांजणगावला जात असताना छावणी उड्डाणपुलावर बसची पाठच्या बाजूची काच निखळून दोन मुलं बाहेर पडली होती. या अपघातात ही मुले गंभीर जखमी झाली होती. या घटनेनंतर पालक धास्तावले असून स्कूलबसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. या गंभीर प्रकारानंतर जाग्या झालेल्या आरटीओने एकाच वेळी शहरातील सगळ्या स्कूलबस तपासणी केली. पहाटे पाच वाजता सुरू करण्यात आलेली ही कारवाई सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू होती. या तपासणीमध्ये 100 स्कूल बसवर कारवाई करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या