
फ्रान्सचा एनबीए स्टार बास्केटबॉलपटू रुडी गोबर्टला भयानक कोरोनाची लागण झाल्याची कळताच अमेरिकेतील एनबीए लीग स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.मात्र फ्रान्सच्या गोबर्टने आपल्या देशातील कोरोनाग्रस्तांची या रोगापासून मुक्त होण्याची धडपड पाहिली आणि या रोगाने पीडित रुग्णांच्या उपचारासाठी 5 लाख अमेरिकन डॉलर म्हणजे सुमारे 3 कोटी 80 लाख रुपयांची मदत रोगाशी झुंझणाऱ्या संस्थांना करण्याचा निर्णय घेतला.स्वतः कॉरोनविरुद्ध झुंज देणाऱ्या रुडीच्या या दरियादिलीचे जगभरातून कौतुक होत आहे.

रुडी आपली मदत व्हीव्हीन्ट स्मार्ट होम एरिना आणि कोरोना विषाणूशी संबंधित संशोधन आणि उपचार करणाऱ्या संस्थांना देणार आहे.त्यामुळे फ्रान्सच्या ओक्लोहोमा शहरातील अनेक सेवाभावी संस्थांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. गोबर्ट एनबीएच्या उताह जॅझ संघाचा बास्केटबॉलपटू आहे.त्यांने त्याच्यावर उपचार होत असताना रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची कोरोनाशी लढण्याची तळमळ पाहिली.आपणही या भयानक रोगाविरुद्धच्या लढ्यात खारीचा वाटा उचलावा असे वाटल्याने त्याने या रोगासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना मोठी आर्थिक मदत देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला.२७ वर्षीय रुडी हा कोरोनाबाधित झालेला जगातील पहिला बास्केटबॉल स्टार ठरला आहे.
कोरोना विषाणूने संक्रमित झालेल्या रुग्णांना बरे करण्यासाठी जग मोठ्या तळमळीने लढताना पाहीले आणि मलाही या रोगाविरुद्ध लढण्यासाठी मदत करावीशी वाटली.मी माझ्या परीने कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी छोटीशी मदत करीत आहे.माझ्या फ्रान्समधील रुग्णांना त्याचा अधिक लाभ होणार याचेच समाधान आहे.
– रुडी गोबर्ट, एनबीए स्टार ,उताह जॅझ





























































