
आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 13 जून रोजी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 36 पैशांनी घसरून 78.29 च्या आतापर्यंतच्या सर्वात निचांकी पातळीवर गेला. त्यामुळे रुपयाची ही घसरण ऐतिहासिक ठरली आहे. गुंतवणूकदार कोणतीही जोखीम घेण्यास तयार नसल्याने एवढी मोठी घसरण पाहायला मिळत आहे. कमकुवत आशियाई चलने, मंदीचा कल आणि सतत परकीय भांडवलाचा प्रवाह यामुळे गुंतवणूकदारांवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत असल्याचा अंदाज विदेशी मुद्रा व्यापार्यांनी वर्तवला आहे.
परकीय चलनात, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 78.20 वर उघडला, नंतर 78.29 वर विक्रमी निम्न पातळीवर पोहोचला. ही घसरण 36 पैशांची होती.
शुक्रवारी, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 19 पैशांनी घसरून 77.93 च्या नीचांकी पातळीवर बंद झाला होता.























































