
गेल्या 30 वर्षांत कश्मीरातील हिंसाचारात सुमारे 50 हजार जवान शहीद झाले. हजारो नागरिक मृत्युमुखी पडले. कुठल्याही थेट युद्धात झाली नाही तेवढी हानी कश्मीरातील अतिरेक्यांच्या छुप्या युद्धात झाली. अतिरेक्यांचे फाजील लाड करू नका, त्यांच्या गोळीला गोळीनेच उत्तर द्या, असे शिवसेनाप्रमुख नेहमी सांगत. सुरक्षा दले आज हेच काम धडाकेबाजपणे करीत आहेत. कश्मीरातील बारामुल्ला जिल्हा ‘दहशतवादमुक्त’ जाहीर झाला. त्यासाठी हिंदुस्थानी लष्कराला ‘कडक सॅल्युट’! संपूर्ण खोऱयातच ‘बारामुल्ला पॅटर्न’ राबवून सारे कश्मीर स्वच्छ करायला हवे.
पृथ्वीवरील स्वर्ग अशी ओळख असणाऱया कश्मीरचे इस्लामी दहशतवाद्यांनी गेल्या 30 वर्षांत अक्षरशः नरकात रूपांतर केले. बॉम्बस्फोट, गोळीबार, रक्तपात झाला नाही आणि किंकाळय़ा ऐकू आल्या नाहीत, असा एकही दिवस कश्मीरात कित्येक वर्षांत उजाडला नाही. हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये विसावलेले हे सुंदर नंदनवन पाकिस्तानने सदैव धुमसतच ठेवले. मात्र तब्बल 30 वर्षांनंतर कश्मीरातून प्रथमच एक चांगली बातमी येत आहे. कधीकाळी पाकसमर्थक अतिरेक्यांनी संपूर्णपणे पोखरून टाकलेला कश्मीरचा बारामुल्ला जिल्हा आता ‘दहशतवादमुक्त’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या कामगिरीबद्दल हिंदुस्थानी लष्कराचे, आपल्या जाँबाज अधिकारी आणि जवानांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. कश्मीरचे समग्र खोरे आणि पाकिस्तानला लागून असलेल्या दहशतग्रस्त जिल्हय़ांची भौगोलिक परिस्थिती पाहता कायम अशांत असलेल्या कश्मीर खोऱयातील एक जिल्हा अतिरेक्यांच्या तावडीतून पूर्णपणे मुक्त करणे ही काही सामान्य कामगिरी नव्हे. एकही अतिरेकी शिल्लक नसलेला पहिला जिल्हा म्हणून बारामुल्लाची नोंद होणे ही त्याअर्थाने मोठीच आणि अभिमानास्पद बातमी आहे. जम्मू-कश्मीरचे पोलीस दल आणि निमलष्करी दलाच्या तुकडय़ांनी ‘ऑपरेशन ऑलआऊट’अंतर्गत कश्मीरातील एकूण एक अतिरेक्याचा खात्मा करण्याची मोठी मोहीमच हाती घेतली आहे. मागच्या दोन वर्षांत कश्मीर खोऱयात हिंदुस्थानी लष्कराने सुमारे
400 अतिरेक्यांना कंठस्नान
घातले. दोन वर्षांपूर्वी बारामुल्ला जिल्हय़ातील उरी येथील लष्करी तळावर भ्याड हल्ला करून अतिरेक्यांनी लष्कराच्या 16 जवानांचे प्राण घेतले होते. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात जवान शहीद झाल्यानंतर हिंदुस्थानी लष्कराने आक्रमक धोरण स्वीकारून पहिल्यांदा पाकिस्तानात घुसून जबरदस्त ‘सर्जिकल स्ट्राइक’ केला आणि त्यापाठोपाठ ‘ऑपरेशन ऑलआऊट’ जाहीर करून अतिरेक्यांना वेचून वेचून खतम करण्याचा सपाटाच लावला. सुरक्षा दलाच्या सर्वच विभागांनी एकमेकांशी जबरदस्त समन्वय राखून आधी अतिरेकी संघटनांच्या म्होरक्यांनाच टिपले. लश्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहंमद आणि हिजबुल मुजाहिदीन या प्रमुख अतिरेकी संघटनांच्या कमांडर्सचे एकापाठोपाठ एक एन्काऊंटर झाले. बुरहान वाणीपासून सुरू झालेला एन्काऊंटरचा हा सिलसिला अजूनही सुरूच आहे. लष्कराच्या धडाकेबाज कारवाया आणि चकमकींचीच दहशतवाद्यांच्या मनात इतकी दहशत निर्माण झाली की, अतिरेकी संघटनांना कमांडर मिळणेही मुश्कील होऊ लागले. एखाद्या नवीन अतिरेक्याची कमांडर म्हणून नियुक्ती झालीच तर काही दिवसांतच एन्काऊंटरमध्ये त्याचा मृत्यू झाल्याची बातमी येऊ लागली. कश्मीरातील अतिरेकी संघटनांचे संचालन करणाऱया पाकिस्तानातील हाफीज सईद, आयएसआय आणि पाक सैन्याचीही यामुळे मोठीच कोंडी झाली. सर्वच अतिरेकी संघटनांना तरुण
अतिरेक्यांची रसद पुरवणाऱया
बारामुल्ला जिल्हय़ाचीच हिंदुस्थानी लष्कराने सर्वात आधी नाकाबंदी केली. कश्मिरी जनतेकडून होणारी दगडफेक, कश्मीरातील राजकीय पक्षांकडून होणारा विरोध याला भीक न घालता सुरक्षा दले ‘ऑपरेशन ऑलआऊट’ अत्यंत प्रभावीपणे राबवत आहेत. संपूर्ण कश्मीर खोऱयातच लष्कराचे हे ‘ऑपरेशन’ सुरू असले तरी बारामुल्लामध्ये या मोहिमेला सर्वात आधी यश मिळाले. बुधवारी सुरक्षा दलांनी बारामुल्लाच्या साफियाबाग भागात शेवटच्या तीन अतिरेक्यांचे एन्काऊंटर केले. सीआरपीएफ आणि जम्मू-कश्मीरच्या पोलिसांनी संयुक्तपणे अभियान राबवून या अखेरच्या तीन अतिरेक्यांना खतम केले. या अतिरेक्यांकडून मोठय़ा प्रमाणात शस्त्र्ाास्त्र्ाs आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. ही धडाकेबाज कारवाई संपल्यानंतर जम्मू-कश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबागसिंह यांनी बारामुल्ला जिल्हय़ात आता एकही अतिरेकी जिवंत नसल्याची अधिकृत घोषणा केली. गेल्या 30 वर्षांत कश्मीरातील हिंसाचारात सुमारे 50 हजार जवान शहीद झाले. हजारो नागरिक मृत्युमुखी पडले. कुठल्याही थेट युद्धात झाली नाही तेवढी हानी कश्मीरातील अतिरेक्यांच्या छुप्या युद्धात झाली. अतिरेक्यांचे फाजील लाड करू नका, त्यांच्या गोळीला गोळीनेच उत्तर द्या, असे शिवसेनाप्रमुख नेहमी सांगत. सुरक्षा दले आज हेच काम धडाकेबाजपणे करीत आहेत. वर्षानुवर्षे दहशतवादाने जळणाऱया कश्मीरातील बारामुल्ला जिल्हा आज ‘दहशतवादमुक्त’ झाला. त्यासाठी हिंदुस्थानी लष्कराला ‘कडक सॅल्युट!’ संपूर्ण खोऱयातच आता बारामुल्ला पॅटर्न राबवून सारे कश्मीर स्वच्छ करायला हवे.





























































