नारायण राणेंवरील ‘सामना’च्या अग्रलेखाचे नाशिकमध्ये पोस्टर झळकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
editorial-hoarding
फोटो - भूषण पाटील, नाशिक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी अटक करून जामीनावर सुटका करण्यात आली. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. नारायण राणे यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली होती. राज्यभर आंदोलने झाली. यासंपूर्ण प्रकरणी नाराणय राणे यांच्या वक्तव्याचा समाचार बुधवारी ‘दैनिक सामना’च्या अग्रलेखातून घेण्यात आला. ‘भोकं पडलेला फुगा!’ या मथळ्याखाली सामनाच्या अग्रलेखातून नारायण राणे यांच्या आक्षेपार्ह विधानावर आसूड ओढण्यात आले आहेत. याचे पोस्टर नाशिक शहरात मोक्याच्या ठिकाणी झळकले.

बुधवारी दिवसभर दैनिक सामनाचा अग्रलेख हा चर्चेत राहिला. नेहमी प्रमाणे देशभरातील वृत्तवाहिन्यांवर अग्रलेखाची चर्चा सुरू होती. त्याच सोबत सोशल मीडियावर देखील अग्रलेखावरून प्रतिक्रिया येत होत्या.

नाशिकमध्ये तर शहरात विविध ठिकाणी अग्रलेखांचे पोस्टर झळकले. नाशिक महापालिकेतील विरोधीपक्ष नेते अजय बोरस्ते यांनी अग्रलेखाचे पोस्टर मोक्याच्या ठिकाणी लावले आणि शहरभर त्याची चर्चा सुरू होती. वृत्तवाहिन्यांनी देखील शहरात लागलेल्या अग्रलेखाच्या पोस्टरची दखल घेतली. पोलिसांनी हे पोस्टर लावण्यास विरोध केला कारवाईचा इशारा देत अडवणूक करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोस्टर लावण्यासाठी रितसर परवानगी घेण्यात आल्याचे बोरस्ते यांनी सांगितले.

editorial-hoarding