सचिनच्या ‘ड्रीम 11’मध्ये टीम इंडियाचे 5 खेळाडू, पण ‘फिनिशर’ला स्थान नाही

106

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आला आयसीसी क्रिकेट विश्वचषक आता संपला आहे. यजमान इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करून विश्वविजेतेपद पटकावले. यानंतर टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वर्ल्डकपमधील आपला सर्वोत्तम 11 खेळाडूंचा संघ निवडला आहे. या संघात सचिनने हिंदुस्थानच्या पाच खेळाडूंना स्थान दिले आहे. परंतु जगातील ‘बेस्ट फिनशर’ असा नावलौकिक मिळवलेल्या खेळाडूला मात्र संघात स्थान देण्यात आलेले नाही.

आयसीसीच्या ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’मध्ये रोहित व बुमराहची वर्णी, विराटला डावलले

सचिनने आपल्या ‘ड्रीम 11’ची कमान उपविजेत्या न्यूझीलंडच्या केन विलियम्सन याच्यावर सोपवली आहे. तर विश्वविजेत्या इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोवर यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवली आहे. सचिनच्या संघात रोहित शर्मा, विराट कोलही, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा आणि जसप्रीत बुमराह असे पाच हिंदुस्थानी खेळाडू आहेत. परंतु यष्टीरक्षक फलंदाज एम.एस.धोनीला मात्र सचिनने डावलले आहे.

विराटच्या जागी रोहित शर्मा? टीम इंडियात मोठे बदल होणार असल्याची चर्चा

सचिनची ‘ड्रीम 11’
रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षग), केन विलियम्सन (कर्णधार), विराट कोहली, शाकिब-अल-हसन, हार्दिक पांड्या, बेन स्टोक्सस रवींद्र जाडेजा, मिशेल स्टार्क, जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमराह.

आपली प्रतिक्रिया द्या