सई परांजपे साहित्य अकादमीच्या अनुवाद पुरस्काराने सन्मानित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध लेखिका, नाटककार, दिग्दर्शिका सई परांजपे यांना ‘आणि मग एक दिवस’ या अनुवादित पुस्तकासाठी मराठी अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कार काल प्रदान करण्यात आला. 50 हजार रुपये, ताम्रपत्र  असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

साहित्य अकादमीच्या वतीने  कोपर्निकस मार्गावरील कमानी सभागृहात आयोजित ‘साहित्योत्सवा’च्या दुसऱया दिवशी 2019 सालचे अनुवाद पुरस्कार अकादमीचे अध्यक्ष प्रा. चंद्रशेखर कंबार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी हिंदी भाषेतील प्रख्यात कथा लेखिका चित्रा मद्गल उपस्थित होत्या.

या समारंभात एकूण 19 प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारातील सर्वोत्कृष्ट अनुवादित साहित्यकृती व अनुवादकांना  पुरस्कार प्रदान करण्यात आले. ‘आणि मग एक दिवस’ हा प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या ‘ऍण्ड देन वन डे’ या आत्मचरित्राचा मराठी अनुवाद आहे.