मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजे 2 सप्टेंबरला राष्ट्रपतींना भेटणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेतल्यानंतर आता खासदार संभाजीराजे छत्रपती हे 2 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपतींनी त्यांना भेटीसाठी वेळ दिली असून यावेळी सर्वपक्षीय खासदारांच्या प्रत्येकी एका प्रतिनिधीने उपस्थित राहावे असे आवाहनही संभाजीराजे यांनी केले आहे.

मराठा आरक्षणासंदर्भातील परिस्थितीची जाणीव राष्ट्रपतींना करून द्यावी या उद्देशाने संभाजीराजे छत्रपती यांनी वेळ मागितली होती. त्यांची ही मागणी राष्ट्रपतींनी स्वीकारल्याची माहिती संभाजीराजे यांनी ट्विटद्वारे दिली. 2 सप्टेंबर रोजी ही भेट होणार असून यावेळी सर्वपक्षीय प्रत्येकी एका खासदार प्रतिनिधीने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे. यासाठी त्यांनी आज सर्व पक्षांचे अध्यक्ष व गटनेत्यांना पत्रही पाठवले आहे.