
निवृत्ती काशिनाथ देशमुख ऊर्फ इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात खटला दाखल होता. याप्रकरणी संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने हा खटला रद्दबादल ठरवला. त्यामुळे इंदोरीकर महाराजांना दिलासा मिळाला आहे. इंदोरीकर महाराज यांनी बाळाच्या जन्मासंदर्भात वादग्रस्त विधान केल्याचा आरोपावरून त्यांच्याविरोधात संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी 19 जून 2020 रोजी संगमनेर न्यायालयात खटला दाखल केला होता.


























































