राज्यपाल राज्य चालवतात का? शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना फटकारले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांना भेटण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना भेटावे. सरकार मुख्यमंत्री चालवतात. विरोधी पक्षनेते जर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील तर प्रश्न सुटतील. राज्यपाल काय राज्य चालवतात का? अशा शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उठसूट राजभवनावर धाव घेणाऱया विरोधकांना चांगलेच फटकारले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सरकारविरोधातील प्रकरणे सादर केली. याकडे दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी शिवसेना नेते संजय राऊत यांचे लक्ष वेधल असता, राज्यपाल कोश्यारी हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांना भेटायला विरोधक गेले असतील, असा टोला लगावला. राज्यपाल हे पद संवैधानिक आहे. त्या पदाचा मान राखला पाहिजे, पण राज्यपालांचा मान विरोधकांनीच ठेवला नाही. राजभवन हा राजकारणाचा अड्डा झाला असल्याचे ते म्हणाले.

…म्हणून आमदारांच्या फायलीवर सही नाही

राज्यपालांनी आपल्या पदाची गरीमा राखावी. अजून त्यांनी 12 आमदारांबाबत निर्णय का घेतला नाही. राज्यपाल भाजपच्या दबावाखाली 12 आमदारांच्या या फायलीवर सही करत नाहीत. राज्यपालांना चांगली प्रतिमा हवी असेल तर त्यांनी संविधानानुसार कामे करावीत. संवैधानिक पदाचा दुरुपयोग कुणीही करू नये, असे संजय राऊत म्हणाले.

फडणवीस भिजलेले फटाके घेऊन दिल्लीत

महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते काल दिल्लीत आल्याचे कळले. म्हणे काही बॉम्ब वगैरे घेऊन आले होते. पण, तो बॉम्ब नसून भिजलेला लवंगी फटका आहे. फडणवीस यांना भिजलेले फटाके घेऊन वारंवार पह्डण्याची सवय आहे. ते वाजत नाहीत. कोणत्याही अधिकाऱयाचे आक्षेपार्ह संभाषण झाले असेल तर त्याच्या चौकशीसाठी महाराष्ट्राचे गृहखाते सक्षम असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.