सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता पादचारी पुलावर लवकरच मजबूत जिना, शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश

सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता पुलावरून पुर्ला टर्मिनस टिळकनगर स्टेशन येथे खाली उतरण्यासाठी प्रस्तावित केलेल्या पादचारी जिन्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे या कामासाठी महापालिकेने रेल्वेला 1 कोटी 4 लाखांचा निधी वर्ग केला आहे.

संबंधित जोडरस्ता पुलावरून पादचारी जिना नसल्याने रहिवासी-प्रवाशांची गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी सांताक्रुझ चेंबूर लिंक रोड येथून लोकमान्य टिळक टर्मिनसला पादचारी पायऱया व रेलिंग बसवण्याबाबत पालिका आणि रेल्वेकडे पाठपुरावा केला.

पालिका प्रशासनाकडून याची तातडीने दखल घेऊन पाहणी करण्यात आली. या कामाची निकड लक्षात घेऊन पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडूनही  संबंधित कामाला मंजुरी देण्यात आली.

संबंधित काम रेल्वेच्या अखत्यारीत येत असल्यामुळे या कामासाठी पालिकेकडून रेल्वेला निधीही वर्ग करण्यात  आला. या कामासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवून काम केले जाणार आहे. त्यामुळे या पादचारी पूल जिन्याचा प्रश्न मार्गी लागला असून या विभागातील शेकडो रहिवासी-प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या