
सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर युवकाची ओळख झाल्यानंतर त्याने मोबाईल नंबर घेऊन लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार केला. या घटनेत युवती 6 महिन्यांची गरोदर राहिली असून, फसवणूक केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शुभम भालेराव (मूळ रा. निगडी अंगापूर, ता. सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 21 वर्षीय सातारा तालुक्यातील एका गावातील युवतीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पीडित युवतीची संशयित युवकासोबत काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर ओळख झाली. यातून संशयिताने युवतीचा मोबाईल नंबर घेतल्यावर संशयिताने लग्नाची मागणी घातली. पुढे दोघे एकमेकांना भेटल्यानंतर पीडित युवतीवर युवकाने म्हसवे गावच्या हद्दीत एका शेतात बलात्कार केला. या घटनेने ती युवती गरोदर राहिली. युवतीने लग्नाचा तगादा लावल्यानंतर संशयिताने सुरुवातीला थांबण्यास सांगितले. मात्र, संशयित टाळाटाळ करू लागल्याने फसवणूक झाल्याने अखेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. युवतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.


























































