रवी शास्त्रींबरोबर मतभेद ही तर अफवा

432

‘टीम इंडिया’चे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी आपले कुठलेही मतभेद नसून ही फक्त अफवा आहे, असे स्पष्टीकरण हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी केले. गांगुली म्हणाले, रवी शास्त्री यांच्याशी मतभेद असण्याचे कारण नाही. पदावरील व्यक्तीने आपली जबाबदारी चोखपणे बजावावी. कामगिरी दाखविली तर ते पदावर राहतील. कामगिरी खराब झाली तर कोणीतरी दुसरा त्यांची जागा घेणार. मी क्रिकेट खेळत होतो तेव्हाही हेच नियम होते. अंदाज बांधणे, स्पष्टीकरण देणे किंवा कोण काय म्हणतं हे तर होतच राहणार, मात्र प्रत्येकाचे लक्ष्य हे 22 यार्डामधील कामगिरीवर असायला हवे. विराट कोहली व सचिन तेंडुलकर हे त्यांच्या कामगिरीमुळे संघात कायम राहिले असे उदाहरणही गांगुली यांनी यावेळी दिले. रवी शास्त्री व सौरभ गांगुली यांच्यातील मतभेद 2006 मध्ये चव्हाटय़ावर आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या