
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने आता कर्जाच्या वसुलीसाठी गांधीगिरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एखादा ग्राहक आपल्या कर्जाचा ईएमआय भरणे विसरल्यास त्याला आठवण करून देण्यासाठी फोन कॉल न करता चॉकलेट पाठवण्याची योजना आणली आहे. त्यामुळे संबंधिताला न दुखवता कर्ज वसुली करता येणार आहे.
देशात सध्या कर्ज घेणाऱयांची मोठी संख्या असली तरी त्याच्या परतफेडीचा हप्ता वेळेत भरणाऱ्यांचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे एखाद्या कर्जदाराने आपल्या कर्जाचा मासिक हप्ता चुकवल्यास त्याची आठवण करून देण्यासाठी बँकेकडून संबंधितांना वारंवार पह्न कॉल केला जातो. मात्र अनेकदा ते बँकेच्या पह्न कॉलला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे एसबीआयने कर्जदारांना चुकलेला ईएमआय भरण्याची आठवण करून देण्यासाठी एसबीआयचा अधिकारी तुमच्या घरी चॉकलेट घेऊन आला तर आश्चर्य वाटू देऊ नका. तसेच आपल्या कर्जाचा ईएमआय चुकू नये म्हणून खबरदारी घ्यावी, असे आवाहन बँकेने केले आहे.


























































