
आपण अनेकदा पाहतो किंवा ऐकतो की, वर्षानुवर्षे एकत्र असलेले वैवाहिक जोडपे कालांतराने एकमेकांसारखे दिसायला लागतात. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव, शरीराची बोली, हास्य यांमध्ये प्रचंड समानता आलेली असते. बरेचदा तर त्यांची चेहरेपट्टीदेखील समान दिसायला लागलेली असते. काही जोडपी तर चक्क ‘तुम्ही बहीण- भाऊ आहात का?’ अशा अनोळखी माणसांच्या प्रश्नाला सामोरी जाताना दिसतात. या सत्यामागे नक्की वैज्ञानिक कारण काय आहे, त्याचा शोध लावण्याचे शास्त्र्ाज्ञांनी काही वर्षांपूर्वी ठरवले आणि समोर आले एक रंजक सत्य.
या प्रयोगासाठी शास्त्रज्ञांनी 500 जोडप्यांची लग्न झाल्यावर लगेच घेतलेली आणि त्यानंतर 25 वर्षांनंतरची छायाचित्रे गोळा केली. या प्रयोगात असे दिसून आले की, लग्नानंतर लगेचच घेतलेल्या पह्टोंमध्ये पती आणि पत्नी खूप वेगळे दिसत आहेत आणि लग्नाच्या 25 वर्षांच्या नंतरच्या पह्टोमध्ये त्यांच्या लुकमध्ये बरेच साम्य आहे. या प्रयोगाच्या दुसऱ्या टप्प्यात लुकनुसार खूप साम्य आढळलेल्या विवाहित जोडप्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. ज्यामध्ये हे कळले की, ही जोडपी त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहेत आणि दोघेही एकमेकांच्या वागण्याने खूप आनंदी आणि समाधानी आहेत.
लग्नानंतर बराच काळ एकत्र राहिल्यानंतर पती आणि पत्नी खूप सारखे दिसू लागतात. याचे कारण ते वर्षानुवर्षे एकमेकांचे वर्तन आणि हावभाव बारकाईने पाहतात आणि एकमेकांची बऱ्याच प्रमाणात कॉपी करू लागतात. उदाहरणार्थ, पती आणि पत्नी दीर्घकाळ एकत्र राहिल्यामुळे त्यांचे हसणे आणि बोलणे सारखेच होते. जोडीदार म्हणून ते एकत्र जे काही करतात त्याचा परिणाम त्यांच्या देहबोलीवर आणि भावनिक स्थितीवर होतो. शेवटी एकमेकांसारखे दिसण्याचे आणखी एक कारण म्हणजे तुमच्या जोडीदारासोबत अनुभव शेअर करणे. त्यांच्या संपूर्ण आयुष्यात, जोडपी खूप आनंदी आणि दुःखी क्षण अनुभवतात. दीर्घकाळ एकत्र राहिल्यानंतर, जसजसे संबंध वाढत जातात, तसतशी समानताही वाढते.


























































