
अरुणाचल येथील अंजाव जिह्यातील नदीत पडून बेपत्ता झालेल्या नायक प्रकाश सिंग व लान्सनायक हरेंदर सिंग या दोन लष्कराच्या जवानांचा शोध अद्याप सुरूच आहे. 28 मे रोजी हे जवान बेपत्ता झाले होते.
तेव्हापासून तब्बल दोन आठवडे या जवानांचा शोध सुरू आहे. हे जवान बेपत्ता झाल्यानंतर तत्काळ शोधकार्य हाती घेण्यात आले होते. हवाईमार्गे हेलिकॉप्टर तसेच जमिनीवर श्वान शोधपथकाच्या माध्यमांतून या जवानांचा शोध घेण्यात आला, मात्र मागील दोन आठवडय़ांपासून ते सापडलेले नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांना शोधकार्याबद्दल सर्व माहिती पुरविली जात आहे.




























































