लालूप्रसाद यादव, चिराग पासवान, संगीत सोम, पप्पू यादव यांच्या सुरक्षेत कपात

59
lalu-yadav

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील अनेक मोठ्या नेत्यांना पुरवण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, बसपा खासदार सतीशचंद्र मिश्रा, उत्तर प्रदेशातील भाजप नेते संगीत सोम, भाजप खासदार राजीव प्रताप रुडी यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री असलेले सुरेश राणा, एलजेपीचे खासदार चिराग पासवान, माजी खासदार पप्पू यादव यांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने या नेत्यांचा सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सीआरपीएफ जवानांकडून सुरक्षा पुरवण्यात येणाऱ्या नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची सीआरपीएफ जवानांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. लालू प्रसाद यादव यांना आता केंद्राकडून सुरक्षा मिळणार नाही. त्याचप्रमाणे माजी केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी यानांही आता केंद्राची सुरुक्षा मिळणार नाही. राज्यसभा खासदार सतीशचंद्र मिश्रा यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री सुरेश राणा यांनाही केंद्राकडून मिळणारी सुरक्षा काढण्यात आली आहे. भाजपा खासदार संगीत सोम यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. एलजेपी खासदार चिराग पासवान यांच्याही सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. त्यांची सीआरपीएफची सुरक्षा काढण्यात आली आहे. त्यांना आता वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था मिळणार आहे. त्याचप्रमाणे पप्पू यादव यांचीही सुरक्षा व्यवस्था घटवण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या