
गायरानातील अतिक्रमणधारकांचे गेले तीन दिवस पन्हाळा प्रांत कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. आज चक्क सरण रचून शंकर कांबळे यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला; पण पन्हाळा पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. गायरानातील अतिक्रमणासंदर्भात पन्हाळा प्रांत कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मुलकीपड संघटनेचे अध्यक्ष शंकर कांबळे, पूजा कदम व अशोक गायकवाड यांनी आज प्राप्त कार्यालयासमोर सरण रचून आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.






























































